औरंगाबाद (प्रतिनिधी):उत्तराखंड टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या वर्ल्ड टेनिस टूर ज्युनिअर फाईव्ह स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रवण कोरडे व तेलंगणाच्या निखिल डिसोजा जोडीने पुरूष दुहेरीच्या क्वाॅर्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
डेहराडून येथे सुरू असलेल्या स्पर्धेत औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रणवसह जोडीदार निखिलने दिल्लीच्या सिद्धांत शर्मा व उत्तराखंडच्या टॉपलिंगा जोडीला तीन सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात ४-६, ६-४, १०-४ ने पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. एमएसएलटीएच्या प्रणवची आंतरराष्ट्रीय क्रमवारीत १५०० आहे.