औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटना व मनपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत हिमांशू गुडलेने विजेतेपदाची हॅटट्रिक साधली. तर, चंद्रांशू गुडले व सार्थक नलावडेने दुहेरी यश मिळवले. बन्सीलाल नगर येथील हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत २५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजेत्या खेळाडूंना बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
विजेते खेळाडू :
एकेरी गट १० वर्ष – चंद्रभू गुंडले, श्लोक पाटील. मुली – स्वरा साळुंके, नैनिका रिंगणगावकर. १३ वर्ष मुले – सार्थक नलावडे, आदित येणगेरेही. मुली – सारा साळुंके, अनन्या तुपे. १५ वर्ष मुले – हिमांशू गुंडले, राघव धुमक. १६ वर्ष मुली – श्रावणी सातारकर, सारा साळुंके. १७ वर्ष मुले – हर्ष तांबोरे, राघव धुमक. मुली – तनुश्री देशमुख, सिया बेबडे.
दुहेरी १३ वर्ष मुले – सार्थक नलावडे व गौरव बोंगाने, यश निकम व अर्पित तिवारी. १५ वर्ष मुले – हिमांशू गुड व चंद्राशू गुडले, आदित्य बेंबडे व राघव धुमक. १७ वर्ष मुले – हिमांशू गुडले व आदित्य चेंबडे, वंश विजयवर्गी व श्लोक बदाने.
या स्पर्धा यशस्वितेसाठी परीक्षित पाटील, अंजली जोशी, सदाशिव पाटील, निकेत ठराडे, विजय मगरे, मेहसीन खान, शाहेद खान हुसेन खान, संजीव बालय्या आदींनी परिश्रम घेतले.