औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबादचे तीन युवा दिव्यांग खेळाडू रितेश केरे, आशुतोष मोदाणी व मोहम्मद मोहसीन पठाण यांची महाराष्ट्राच्या दिव्यांग अॅथलेटिक्स संघात निवड झाली आहे. रितेश १०० मीटर धावणे, आशुतोष १०० व २०० मीटर धावणे आणि मोहसीन थाळी व गोळा फेक प्रकारात भुवनेश्वर येथे २८ ते ३१ मार्चदरम्यान होणाऱ्या २० व्या राष्ट्रीय दिव्यांग अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील.
निवड झालेल्या खेळाडूंचे औरंगाबाद जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक तुपे, डॉ.पवन डोंगरे, प्रवीण कटारिया, अभय देशमुख, रवींद्र राठी, रुस्तुम तुपे, अजय दाभाडे, विनोद नरवडे, डॉ. फुलचंद सलामपुरे, पंकज भारसाखळे, सुरेंद्र मोदी, अनिल निळे, स्मिता पटारे आदींनी दिव्यांग खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.