औरंगाबाद (प्रतिनिधी) :मिक्स मार्शल आर्टस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नीमच, मध्य प्रदेश येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील १३ खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते ,या स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी सुवर्ण व १ कास्य पदकाची कमाई केली.
पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे
*सुवर्णपदक विजेते- दर्शना खामकर , कबीर कुलकर्णी ,बिस्वजीत अदक प्रांजली इंगोले तर आदित्य कांचन याने या स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली.*
सुवर्णं पदक विजेत्या दर्शना,कबीर,व बिश्वजीत यांची
दुबई येथे होणाऱ्या जागतिक तसेच प्रांजल इंगोले हिची
आशियायी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
विजयी खेळाडूना मुख्य प्रशिक्षक मुकेश बनकर आणि निलेश घोंगडे यांचे मार्गदर्शन लाभले या विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे,आ.अतुल सावे , प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, प्रा.कैलास जाधव,अरुण भोसले,
बळीराम राठोड,संजय गलांडे, मुकेश राजपूत,शुभम ढाकणे, सचिव मुकेश बनकर आदिनी अभिनंदन केले अंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.