जालना (प्रतिनिधी)-केंद्र शासनाच्या भारतीय डाक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंच्या विविध पदाकरिता भरती ची प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून,या खेळाडू भरतीसाठी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्रावीण्यधारक खेळाडू पात्र ठरणार आहे.
भारतीय डाक विभागाच्या खेळाडू भरती करिता स्पर्धेतील पात्र खेळाडूंना विहित वेळेत अर्ज सादर करणे शक्य व्हावे याकरिता शालेय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी संचालनायाद्वारा नमूना क्रमांक 4 मध्ये प्रमाणित करून देण्यात येणार असून जालना जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंनी विहित नमुन्यातील फॉर्म नंबर 4 प्रमाणीत करुन घेण्यासाठी अर्ज 22 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी केले आहे.