जालना (प्रतिनिधी)-खेलो इंडिया चौथ्या युथ गेम्सचे आयोजन दिनांक पाच फेब्रुवारी 2022 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा या राज्यात निश्चित झालेले आहे. या स्पर्धेच्या निवड चाचण्यांचे आयोजन अठरा वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधित्व संघ निवडण्यात कामी खो-खो खेळाच्या जालना जिल्हा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन करणे निश्चित आहे. खो-खो खेळासाठी जिल्हास्तरावर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे स्पर्धा घेण्यात येईल.
तसेच दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता 22 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका ऑनलाईन ई-मेल आयडीवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवाव्यात स्पर्धेच्या दिवशी प्रत्यक्ष हार्ड कॉपी सोबत ठेवावी.या स्पर्धेकरिता आपल्या शाळा-महाविद्यालयातील खेळाडू सहभागी होण्यासाठी क्रीडा शिक्षकासह पाठविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.