औरंगाबाद (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाया राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटन व शिवछत्रपती कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोव्हीड (covid-19) च्या साथी रोगाच्या नियमाचे पालन करून तलवारबाजी, सॉफ्टबॉल खेळातील खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.अशा खेळाडुंच्या मातांच गौरव सोहळा काल पार पडला . दि .१२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ०५:३० वा. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, सौ.उर्मिला मोराळे (क्रीडा उपसंचालिका औरंगाबाद) मा.श्री.मिलिंद पाटील (सचिव श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी न्यू दिल्ली), डॉ.उदय डोंगरे,(राज्य संघटनेचे सचिव), गोकुळ तांदळे, मंजुदेवी खंडेलवाल, सौ छाया पानसे, माधुरी कदम,डॉ.दिनेश वंजारे यांच्या प्रमुख उपस्थित होती.
डॉ. उदय डोंगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी तलवारबाजी खेळाचे यशस्वी वाटचाल विशद करत औरंगाबाद हे तलवारबाजी खेळातील भारतामधील प्रमुख केंद्र असल्याचे नमूद केले. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 20 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली असून महाराष्ट्र शासनाने ६ खेळाडूंना व १ क्रीडा मार्गदर्शक न शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहेत.येत्या काळात निश्चितच औरंगाबादचे खेळाडू आशियाई व ऑलम्पिक स्पर्धेमध्ये मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
श्री मिलिंद पाटील यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यात मार्गदर्शक संघटक यांच्याबरोबर पालकांची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे. असे मत व्यक्त करत इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे खेळाकडे करिअर म्हणून पाहिले जाते. त्याच प्रमाणे आपल्या देशात पालकांनी देखील खेळाकडे करिअर म्हणून पाहिले तर नक्कीच आंतरराष्ट्रीय ओलंपिक पदक विजेते खेळाडू घडतील. असे मत उद्योजक मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. तसेच सौ उर्मिला मोराळे यांनी तलवारबाजी या ऑलिंपिक क्रीडा प्रकाराची औरंगाबादच्या खेळाडूंचे व औरंगाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेचे कार्य बघून भविष्यात नक्कीच ऑलिंपिक पर्यंत तलवारबाजी चे खेळाडू जातील असा विश्वास व्यक्त केला .
सत्कार मूर्ती तसेच विशेष सत्कार करण्यात आले .
कांचन राजीव बडवे. (सागर बडवे:-सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय. दिव्यांग सशक्तिकरण विभाग.भारत सरकार. दिव्यांग सशक्तिकरण साठीचा राष्ट्रीय पुरस्कार. आदर्श व्यक्तिमत्त्व ( रोल मॉडेल) 2020. कर्णबधिर प्रवर्ग.)
राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडूंच्या माता-
कविता लोहिया,सुरेखा शिंदे,रचना शहा,पुष्पा वाघ,प्रतिभा वाहुळ,अल्का पांढरे,अंजली भराड.दिपाली पाटील,संगीता कोरडे,रेखा काजळे.
सॉफ्टबॉल
वंदना मालुसरे,शकुंतला रेंगे,मिनाबाई रुपवते,सपना सुर्यवंशी,स्वाती सवळे,मीरा भोसले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.दिनेश वंजारे यांनी केले तर आभार स्वप्नील तांगडे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.उदय डोंगरे, डॉ दिनेश वंजारे, संजय भूमकर अनिल देवकर स्वप्निल तांगडे, ,स्वप्निल शेळके, अमृता भाटी, मोहित राठोड जयदीप पांढरे.आदी परीश्रम घेतले.