रस्त्यावर चणे विकतोय पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे आहे. रोज या सोशल मीडियावरून लाखो व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. यात अनेकदा खेळांचे किंवा खेळाडूंचेही व्हिडिओ दिसून येतात. नुकतेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक गमतीशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो चर्चेचा विषय ठरला आहे.

 

 

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने पोस्ट केलेल्या गमतीशीर व्हिडिओमध्ये तो रस्त्यावर चणे विकताना दिसत आहे. वहाबच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजादनेसुद्धा यावर मत मांडले आहे. वहाब रियाजने विनोद म्हणून हा व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. काही काळापासून तो क्रिकेटपासून दूर आहे.

त्याने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, “आजच्या दिवसासाठी तुमचा चणेवाला काका, तुमची ऑर्डर पाठवा. काय बनवायचं आणि किती बनवायचं ?”.

 

यावर अहमद शहजाद म्हटला की, “वहाब अंकल अलीला पण थोडे खायचे आहे.” वहाब रियाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला १५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

 

 

वहाब रियाजने २७ कसोटी, ९१ वनडे, ३६ टी-२० या आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत ८३, एकदिवसीय सामन्यांत १२० आणि आंतरराष्ट्रीय२० सामन्यांमध्ये एकूण ३४ बळी आहेत. त्‍याने त्याच्या कारकिर्दीमध्‍ये १००० हून अधिक धावाही केल्या आहेत.

अधिक वाचा –व्हिडिओ: १ चेंडू फेकण्यासाठी वहाब रियाझने घेतला ५वेळा रन-अप

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन अर्धशतके आहेत. पण पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. नोव्हेंबर- डिसेंबर २०२० मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय आणि टी-२० सामना खेळला आहे आणि २०१८ पासून तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

You might also like

Comments are closed.