भारताचा श्रीजेश वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटू;

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धामधील २०२१ वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. २०२०मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने हा पुरस्कार पटकावला होता.

श्रीजेशने हा पुरस्कार मिळवताना स्पेनचा स्पोर्ट्स क्लाइिम्बगपटू अ‍ॅल्बर्ट गिनेस लोपेझ आणि इटलीचा वुशूपटू मिशेल जिओर्डानो यांना मागे टाकले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य श्रीजेशला सर्वाधिक १,२७,६४७ मते मिळाली. या पुरस्काराचा मानकरी ठरणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचे श्रीजेश म्हणाला.

You might also like

Comments are closed.