न्यूझीलंडच्या टीमने अखेरच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. पहिल्या वनडे चा टौस पडण्याच्या आधीच न्युझीलँड क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचे कारण देऊन मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला. या दौर्यात न्युझीलँड ची टीम तीन वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेली होती. न्यूझीलंडने अखेरच्या क्षनी माघार घेतल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मात्र चांगलाच तीळपापड झाला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी कडे ही तक्रार करणार आहे.
न्यूझीलंडच्या टीमने घेतलेल्या या निर्णयानंतर आता आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत आहेत. इंग्लंडची टीमही पाकिस्तान मधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतचं वक्तव्य केले आहे.’न्यूझीलंडच्या टीमने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आमच्या सुरक्षा यंत्रणा ज्या पाकिस्तानमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत आहोत. पुढच्या 24-48 तासांमध्ये आम्ही पाकिस्तान ला जायचं का नाही, याबाबतचा निर्णय घेऊ’,असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.