मुंबई (प्रतिनिधी) – भारतीय शुटींग बॉल फेडरेशन व राजस्थान शुटिंग बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थान येथे ३९ व्या राष्ट्रीय शुटिंग बॉल अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला गटांच्या स्पर्धा टागोर इंटरनॅशनल स्कूल, भद्रा, जि. हनुमानगड येथे १० ते १२ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. सामने दिवस रात्र विद्युत रोषणाईत खेळवले जाणार आहेत. विजयी संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येईल.
गेली अनेक दिवसांपासून संघटनेचे सचिव दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे सहसचिव तसेच प्रशिक्षक जालंदर चकोर यांच्या प्रशिक्षणातून मुंबई शुटिंग बॉल असोसिएशनचा संघ पुर्ण फिटनेस व ताकदीने मेहनत करत होता. स्पर्धेत चमकदार कामगिरी करुच असा आत्मविश्वास घेऊन मुंबईचा संघ राजस्थानकडे रवाना झाला आहे. मुंबई संघाचे प्रशिक्षक जालंदर चकोर यांनी सांगितले की, आम्ही संघाकडून खुप मेहनत करुन घेतली आहे. या शुटींग बॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करु असा आमचा निर्धार आहे.
मुंबई संघ : अय्याज सय्यद (संघनायक), महेश कदम, दिनेश वऱ्होकर, भावेश वाघेला, सचिन बलसाने, अभिजीत बनसोडे, अर्जुन भंडारे, शैलेंद्र निकाळे, यांची संघात निवड झाली आहे. संघ व्यवस्थापक अशोक बलसाने व प्रशिक्षक म्हणून जालंदर चकोर काम बघणार आहेत.