औरंगाबाद (प्रतिनिधी) विशाखापटणम आंध्रप्रदेश राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित आंध्र युनिव्हर्सिटी, विशाखापटणम येथे 39 व्या ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्रच्या मुली संघाला प्रथम तर मुलांच्या संघाला तृतीय पदकावर समाधान मानावे लागले. या राष्ट्रीय स्पर्धेत मुले विभागात आंध्र प्रदेश(प्रथम), राजस्थान (द्वितीय),तर महाराष्ट्र (तृतीय.) मुलींच्या विभागात तेलंगना (प्रथम),महाराष्ट्र (द्वितीय)तर मध्य प्रदेश (तृतीय)स्थानावर राहिले.
आज झालेल्या मुलींच्या 5 इनिंग च्या महाअंतिम सामन्या मध्ये दुसऱ्या इनिंग पर्यंत तेलंगणा संघ 1 होमरन ने वरचढ करत असताना महाराष्ट्र च्या श्रावणी खंबाळकर ने एक होमरन मारून सामना बरोबरीत आणला व तिसऱ्या इ्निंग मध्ये साक्षी येटाळे ने 1 होमरन मारून डाव सावरण्याचा प्रयत्न केला असून , प्रतिउत्तरात तेलंगना संघाने तिसऱ्या, चौथ्या इनिंग मध्ये 6 होमरन ची आघाडी घेत महाराष्ट्र संघाला जिंकण्यासाठी 8 होमरन ची गरज असताना पाचव्या इनिंग मध्ये तेलंगानाच्या पिचर ने महाराष्ट्र संघाला एकही होमरन न मारू देता बाद केले व सामना तेलंगणा संघाने जिंकण्यात यश मिळवले. मुले/मुलीं संघातील मृणाल भामरे, वैष्णवी निकम,सानिका मोरे,वैष्णवी निकम,दिपाली सुवडे,अंजली पवार, सानिका,तन्वी सवळे, गौरी माळी,श्रावणी चौघुले, वेदांत राऊत,दीपक गजभिये यांनी उत्कृष्ठ कामगिरी केरून सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला.
विशाखापटणम येथे राष्ट्रीय स्पर्धे मध्ये महाराष्ट्राच्या पंचाचा दबदबा राहिला. पंचप्रमुख लक्ष्मण गेहलोत (राजस्थान) जुगलकिशोर शर्मा (पंजाब) तांत्रिक समिती प्रमुख मुकुल देशपांडे,(अकोला)संतोष आवचार (औरंगाबाद)सुजय कल्पेकर (अकोला)सुयोग कल्पेकर (अकोला)विकास वानखेडे (अकोला)कोमल शेंडे (चंद्रपूर)प्रिन्स अहिरवार (MP)दिगंबर मीना (राजस्थान)मंदार कुलकर्णी (मुंबई)श्री मोंडल,अमेय नाग(उडीसा)लक्ष्मी प्रसाद (उडीसा)यांनी पंच म्हणून काम पहिले.
महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक अक्षय येवले, कल्पेश कोल्हे,जयेश मोरे व व्यवस्थापक गणेश बेटूदे, सायमा बागवान,दीपक रुईकर,नितीन रोमन यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या मुली /मुले संघाने प्रथम व तृतीय पदक प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल सचिव प्रदीप तळवेलकर,औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथरीकर, उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे, डॉ.उदय डोंगरे, एकनाथ साळुंकेसदानंद सवळे,राकेश खैरनार, दिनेश जायभाये यांनी अभिनंदन केले.
उपांत्य फेरीचे निकाल
मुले विभाग
1) आंध्रप्रदेश वि. वि महाराष्ट्र (7-5) होमरन
मुली विभाग
1) महाराष्ट्र वि. वि मध्यप्रदेश (6-2)होमरन
अंतिम सामन्याचे निकाल
मुले विभाग
1)आंध्र प्रदेश वि. वि राजस्थान (2-1)होमरन
मुली विभाग
1) तेलंगना वि. वि महाराष्ट्र (7-2)होमरन