औरंगाबाद (प्रतिनिधी) देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते स्व.खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला .देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते स्व . खाशावा जाधव यांच्या जन्म दिवशी म्हणजे दिनांक १५ जानेवारी रोजी राज्यभर महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे .
याचेच औचित्य साधून औरंगाबाद जिल्ह्यातील एक विधी क्रीडा संघटनेच्या वतीने आज सायंकाळी शिवछत्रपती महाविद्यालय येथे कोव्हीड १९ ( Covid-19 )या साथी रोगाच्या नियमाचे पालन करून मोजक्याच संघटक यांच्या उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली आहे .
याप्रसंगी ऑलिंपिक संघटनेचे सदस्य व राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे गोविंद शर्मा, डॉ. दिनेश वंजारे, महाराष्ट्र ग्रॅपलींग संघटनेचे अध्यक्ष प्रा .राकेश खैरनार, सागर मगरे, निखिल बावस्कर ,अनिल देवकर आदींची उपस्थिती होती.