नॅशनल गेम्स २०२२: रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा

पुणे (प्रतिनिधी): अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे असे महाराष्ट्राच्या महिला रोईंग संघाचे प्रशिक्षक अंबादास तांबे यांनी सांगितले.या स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक शर्यतीत नाशिकची मृण्मयी शाळगावकर हिच्याकडून चमकदार कामगिरीची खात्री आहे. महिलांच्या क्वाड्रेबल फोर आणि कॉक्सड् एट या दोन्ही सांघिक विभागातही महाराष्ट्र संघ पदक जिंकेल.
पुरुष विभागातही एकेरी व दुहेरी या दोन्ही शर्यतींमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू पदक तालिकेत आपले नाव नोंदवतील. पुरुष खेळाडूंना सुनील कांबळे व समाधान गवळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना चांगल्या सरावाची संधी मिळाली आहे. सर्व खेळाडू आगामी राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी उत्सुक झाले आहेत.महाराष्ट्राचे खेळाडू मंगळवारी येथून अहमदाबाद येथे रवाना होणार आहेत. तेथे दिनांक ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर यादरम्यान रोईंगच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
Comments are closed.