दुबई-आज आयपीएल मध्ये लिग स्टेजचा चा शेवटचा दिवस आहे. यामध्ये मुंबईसमोर हैदराबादचे तर बेंगलोर समोर दिल्लीचे आव्हान असणार आहे. यामध्ये मुंबईने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हैदराबाद मे संघात आश्चर्यकारकरित्या कर्णधार केन विल्यम्सन संघातून बाहेर केले आहे. हैदराबाद कडून मनीष पांडे संघाचे कर्णधारपद भूषवीणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या संघात 2-2 बदल केले आहेत. हैदराबाद मधून विल्यमसन व भुवनेश्वर कुमार ला संघाबाहेर केले आहेत. मोहम्मद नबीची संघात वापसीची झाली आहे. तर मुंबईने जयंत यादव व सौरभ तिवारी च्या जागी कृणाल पांड्या व पियुष चावलाला संघात घेतले आहे. मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी या सामन्यात मोठा विजय आवश्यक आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
मुंबई-ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जिम्मी नीशम, नैथन कुलटर नाईल, जसप्रीत बुमरा, पीयूश चावला, ट्रेंट बोल्ट.
हैदराबाद- जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनीष पांडे, वृद्धिमान सहा, प्रियं गर्ग,अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, मोहम्मद नबी, ऊम्रान मलिक, सिद्धार्थ कौल.