आज मिताली राज नाही केलाय अनोखा विक्रम. मिताली राज कि कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. ही बाब भारतीय महिला संघासाठी अभिमानास्पद आहे. महिला संघाचे कर्णधारपद मिताली राज बजावते. आणि आज वेस्ट इंडिजसोबत झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने चांगली खेळी खेळली आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये आज भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत दोन हात करतोय. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली असून वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचं आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने एक अनोखा विक्रम केलाय. ती महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे. याआधी मिताली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू ठरली होती.
मिताली राजने आजचा सामना खेळत असताना एक अनोखा विक्रम केलाय. ती महिला विश्वचषक स्पर्धमध्ये कर्णाधर म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे. हा विक्रम अगोदर ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. तिने आतापर्यंत कर्णधार म्हणून 23 सामने खेळले आहेत. तर मितालीचा कर्णधार म्हणून आजचा २४ वा सामना आहे. मितालीकडे संघाचे नेतृत्व करण्याचा तगडा अनुभव आहे. तसेच आपल्या दमदार खेळाच्या जोरावर तिने भारतीय संघातील तिचे स्थान बळकट केलेले आहे. याच कारणामुळे ती विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी कर्णधार ठरली आहे. याआधी तिने महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अशा सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू म्हणून मान मिळवला होता. हा विक्रम प्रस्थपित केल्यामुळे ती थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जाऊन बसली होती.
दरम्यान, आज वेस्ट इंडिजसोबतच्या लढतीत फलंदाजीमध्ये मिताली चांगली कामगिरी करु शकली नाही. तिने ११ चेंडूंमध्ये अवघ्या ५ धावा केल्या. तर दुसरीकडे स्मृती मानधना आणि हरमनप्रित कौर या जोडीनेही अनोखा विक्रम रचला. या दोन्ही खेळाडूंनी दमदार शतकी खेळ खेळत १८४ धावांची दीडशतकी भागिदारी केली. एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा मान या जोडीला मिळाला आहे. स्मृती मानधनाने ११९ चेंडूंमध्ये १३ चौकार तसेच २ षटकार लगावत १२३ धावा केल्या. तर हरमनप्रीत कौरने १०७ चेंडूंमध्ये १० चौकार आणि २ षटकार यांच्या जोरावर १०९ घावा केल्या.