छत्तीसगढ:- रायपूर (छत्तीसगढ) येथे भारतीय तलवारबाजी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत उत्तर प्रदेश चे आमदार पंकज सिंह यांची अध्यक्षपदी तर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांची भारतीय तलवारबाजी संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय तलवारबाजी महासंघाच्या सचिवपदी भारतीय ऑलिंपिक महासंघाचे सचिव राजीव मेहता, छत्तीसगड ऑलिंपिक महासंघाचे सचिव बशीर अहमद यांची कोषाध्यक्षपदी तसेच महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांची सहसचिवपदी बिनविरोध करण्यात आली. याप्रसंगी ऑलिंपिक मध्ये पहिल्यांदा तलवारबाजी खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीला भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने 10 लाख रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील सतेज पाटील व डॉ. उदय डोंगरे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे ,कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी जवळकर, मंजू खंडेलवाल, डॉ. दिनेश वंजारे ,क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.