छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सतर्फे सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स डिसेंबर 2024 – जानेवारी 2025 दरम्यान पटियाला (पंजाब) येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत भरातून एकूण 350 प्रशिक्षकांनी क्रिकेट कोचिंग सर्टिफिकेट कोर्स साठी सहभाग नोंदविला होता.
मयुरी गायके ही पटियाला या ठिकाणी असलेले भारतीय प्रशिक्षक पल्लवदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली NIS सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत उत्तीर्ण झाली.
छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची क्रिकेट राष्ट्रीय खेळाडू मयुरी गायके हीने या पूर्वी नांदेड (महाराष्ट्र), उदयपूर (राजस्थान), रेवा (मध्य प्रदेश) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे महिला संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद जोशी, प्रो. शत्रुंजय कोटे, डॉ.रफिक सिद्दीकी,डॉ.अर्चना गिरी, डॉ. सागर कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.