परभणी (प्रतिनिधी): भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाचप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग पुल मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाच मागितली होती. कविता यांनी या मंजुरीसाठी संबंधितांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यात दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी
रंगेहात पकडले आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला पेन्शनसाठी मागितलेले पैसे असो की, क्रीडा कर्मचाऱ्यालाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी मागितलेली पैसे असो अशा अनेक आर्थिक गैर व्यवहाराचे आरोप त्यातच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांनी लावलेली लक्षवेधी चर्चेत असतानाच परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना तब्बल दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पूलचं मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते त्यानंतर ही रक्कम द्यायची नव्हती.
त्यामुळे या तक्रारदाराने परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सध्या त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे.
क्रिडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी गौतम यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मंजूर करण्यासाठी पैसे मागितल्याचा कुटुंबाचा आरोप यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी मांडली होती हाच मुद्दा घेवून उबाठा चे आमदार राहुल पाटील यांनीही नावंदे यांना निलंबित करण्याची मागणी अधिवेशनात केली होती. या विषयी उपसंचालक युवराज नाईक परभणी येथे चौकशी करता गेले होते त्यांनी ही माहिती शासनाला माहिती पुरवली का? असा प्रश्न निर्माण होता. मराठावाडा हा क्रीडा विभाग भ्रष्टाचारराचा केद्र बिदू बनत आहे कि काय. लवकरच अजुन एका जिल्हाच्या क्रीडा अधिकारी वर कारवाई होण्या करता आमदार , क्रीडा प्रेमी आणि स्पोर्ट्स panorama समोर आणार आहे यावर छत्रपती संभाजीनगर विभाग क्रीडा उपसंचालक युवराज नाईक काय कारवाई करता आणि शासन काय भूमिका बजावते हे पाहणे खूप उचुक्त्याच्या ठरणार आहे . मराठवाड्याला चागल्या आणि पूर्ण वेंळ उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी असण्या गरजेच्या आहे या प्रकरणा नंतर राज्याच्या क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी लक्ष्य देण्या खप गरजेचे आहे.
भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना “अभय” कशासाठी?
या पूर्वीचे भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेचे प्रताप
जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची करण्यात येणारी चौकशी हि सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस खात्या अंतर्गत चौकशी करण्यात आली होती . यामध्ये छत्रपती संभाजीनगर उपसंचालक उर्मिला मोराळे , माजी अमरावती उपसंचालक प्रतिभा देशमुख ,पुणे उपसंचालक प्रमोधिनी अमृतवाड यांच्यामार्फत २०१९ साली प्राथमिक चौकशी मधे नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे नावंदेची दुसऱ्यांदा खातेनिहाय चौकशी करण्यात आलेली आहे
त्या अनुषंगाने क्रीडा उपसंचालक कार्यालयाने नावंदे यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील आतापर्यंच्या सेवा कारकिर्दीत घेतलेले वादग्रस्त निर्णय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील लता लोंढे, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांना वैद्यकीय रजा व अन्य कारणांमुळे गैरहजर राहिले असता मेडिकल बोर्डाचे व इतर आवश्यक सर्टिफिकेट सादर करूनही रूजू करून न घेता लटकत ठेवणे, अनुभवी कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर डावलत त्यांच्यावर अविश्वास दाखवून कार्यालयातील निवृत्त अधिकारी राजाराम दिंडे यांना बेकायदेशीरपणे कार्यालयीन कामकाज सोपविले होते, यावरून मोठे वादळ उठले होते.
शासनाने नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम घातत सविस्तर चौकशी अहवालावर निर्णय घेत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, परिणामी खेळाडू, क्रीडा संघटना आणि या कार्यालयात छळ सोसावा लागलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहेत.
२१ व्यायामशाळा साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान वाटपात अनियमितता
जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी आपल्या कार्यकाळात २१ व्यायाम शाळा , साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान या योजना राबविताना अनियमितता आढळून आली आहे.म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये अधिकाराचा वापर करत नावंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचया
या आदेशानुसार नावंदे यांना क्रीडा उपसंचालक यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (पद अधिग्रहण अवधी, स्वियेत्तर सेवा ) निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे (नियम १९८१ मधील कलम ६८ नुसार नावंदे यांना निलंबन निर्वाह व इतर भत्ते दिले जातील , निलंबन काळात त्यांना इतर खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही ,असे आढळून आल्यास हे भत्ते मिळणार नाहीत.तशा आशयाचे प्रमाणपत्र (निलंबन काळात खासगी नोकरी/व्यवसाय करणार नाही) सादर करणे बंधनकारक आहे.असे सुनील हंजे (उपसचिव, महाराष्ट्र शासन) यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालक चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी मुंडे यांनाही क्रीडा स्पर्धेचे बिल काढण्यासाठी पैसे मागितल्याची ऑडियो क्लिप चांगलीच वायरल झाली होती.
दरम्यान, कविता नावंदे यांच्यावर यापूर्वीही गैरव्यवहारांचे अनेक आरोप करण्यात आले होते. तर, नुकतेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जिल्ह्यातील 2 आमदारांनी त्यांच्या कारभाराबद्दल विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यातच, एबीसी अधिकाऱ्यांना धाड टाकून त्यांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. त्याच बरोबर रत्नागिरी आंबा खरेदीच्या व्यवहारातून विक्रेत्या महिलेला आजून न्याय भेटला नाही .
स्पोर्ट्स पॅनोरमा सोबत बोलताना ३० वर्षीय फिर्यादी महिलेने सांगितले की मी त्यांची विद्यार्थिनी असून त्यांनी मला रत्नागिरी येथे स्वसंरक्षणचे धडे दिले आहे.2 लाख 58 हजारचे आंबे विक्री करण्याकरता मागे मार्च २०२० मध्ये आणले होते.आणि माझा फोन उचलत नाही ब्लॉक केला व्हाट्सअप वर काही रिप्लाय देत नाही. माझे आजून रक्कम दिलेली नाही. एक अधिकारी असुन या मॅडम असे वागतात.
ब्रेकिंग न्यूज: जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केली स्वतःच्या विद्यार्थिनीला मारहाण
आशा भ्रष्ट्राचारी क्रीडा अधिकाऱ्याला शासन का वाचवत आले आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या काळात भ्रष्ट्राचारी क्रीडा अधिकारी कविता नावंदे रुजू झाल्या आहे . या प्रकरणात प्रशासन आणि शासन काय करता हे पहानेर खूप उचुक्त्याचे ठरणार आहे.