स्पोर्ट्स पॅनोरमा (औरंगाबाद )-मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) आणि मिता फोर्ज यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ ते १० ऑक्टोबर दरम्यान वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धा ही 40 वर्ष्यावरील सर्व खेळाडूंसाठी खुली असेल. प्रवेश शुल्क सहित कोणतीही टीम यात सहभागी होऊ शकते. ही स्पर्धा औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन असोसिएशनशी संलग्नित आहे तरी अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक खेळाडूंना यात सहभाग घेण्यासाठी मो.क्र. ९२२५३०९९१४ वर संपर्क करावा. केंद्र व राज्य शासनाच्या कोरोना महामारीच्या संदर्भातील सर्व अटी व नियम पाळून स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन मंगेश नीटूरकर, संयोजक मसिआची स्पोर्ट कामिटी, मनीष अग्रवाल, समन्वयक, कमिटी सदस्य कमलाकर पाटील,राहुल घोगरे,अमित राजाळे आणि संदीप पाटील यांनी केले आहे. तसेच स्पर्धेसाठी डी. डेव्हिड आणि राहुल घोगरे हे विशेष परिश्रम घेत आहेत.