मराठमोळी स्मृती मानधना ‘या’ म्युझिक डायरेक्टरला करतीये डेट?

सध्या एकदीवसीय महिला विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधना तिच्या खेळामुळे चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान, नॅशनल क्रश असलेल्या मराठमोळ्या स्मृतीच्या अफेअरची चर्चा देखील चांगलीच रंगू लागली आहे. स्मृती मानधना म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छालला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

 

या दोघांच्या अफेअरची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे पलाश मुच्छालचा एक व्हिडीओ. मध्यंतरी पलाशने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याच्या हातावर SM18 असं लिहिलेला टॅटू दिसत होता. स्मृतीच्या जर्सीचा नंबर १८ आहे त्यामुळे SM18 चा अर्थ स्मृती मानधना १८ असं होतं असल्याचं म्हटलं गेलं. दरम्यान, यावेळी पलाश मुच्छालच्या या व्हिडीओवर कमेंट करताना अनेक युजर्सनी लिहिले, ‘SM18 – म्हणजे स्मृती मानधना १८ आहे का, असंही विचारलं होतं.

पलाश स्मृती मानधनासाठी इतका खास का आहे?’ असा प्रश्न स्मृतीला विचारण्यात आला होता. मात्र, स्मृती मानधना या प्रश्नाचे स्पष्टपणे कोणतंही उत्तर देत नाही आणि मला याविषयी काहीही माहिती नाही असे म्हणाली होती. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल हे एकमेकांसोबत दिसत असले आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा असली तरी या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही वक्तव्य केलेलं नाही.

याशिवाय अनेक वेळा स्मृती मानधना आणि पलाश मुच्छाल सोबत दिसले आहेत. जेव्हा पलाश मुच्छालचे नवीन गाणे ‘आखरी बार’ रिलीज झाले, तेव्हा स्मृती मानधनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे प्रमोशनही केले होते. त्याचवेळी एका शोमध्ये स्मृती मानधनाला पलाश मुच्छालशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता.

You might also like

Comments are closed.