औरंगाबाद (प्रतिनिधी):भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २५ वर्षाखालील सी.के. नायडू स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा २० सदस्यीय क्रिकेट संघ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान यांनी जाहीर केला. संघाचे नेतृत्व पवन शाहकडे देण्यात आले आहे. त्याच्या जोडीला हर्षल कळे उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली.
एलिट ड गटाची ही स्पर्धा विजयवाडा येथे २२ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान खेळवली येणार आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना २२ ते २५ मार्चदरम्यान रेल्वे संघाशी होईल. दुसरा सामना २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान विदर्भ आणि तिसरा सामना ५ ते ८ एप्रिलदरम्यान चंदीगडशी खेळवला जाणार आहे.
महाराष्ट्राचा संघ : –
पवन शाह (कर्णधार), हर्षल काळे, श्रेयस वालेकर, सिद्धांत दोशी, धीरज पाटनघरे, उबैद खान, रणजीत निकम, अंकित नलावडे, यश क्षीरसागर, सिद्धेश वीर, सौरभ नवले, अभिषेक पवार, सुरज शिंदे, आनंद ठेनगे, सचिन भाेसले, प्रशांत सिंग, जयदीप भराडे, रामकृष्ण घोशी, शुभम कोठारी, अभिषेक निशाद.