गांधीनगर- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष स्क्वॉश संघाने अंतिम फेरीत धडक मारुन एक पदक निश्चित केले आहे.आयआयटी गांधीनगर येथे मंगळवारी झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने बलाढ्य सेनादलाच्या संघास 2-1 ने पराभूत करून अंतिम फेरी गाठली हे विशेष.
उपांत्य फेरीत स्पर्धेमध्ये मोहित भट याने प्रथम खेळताना सेनादलाच्या रवी दीक्षित याला 11- 9. 9-11, 11-4, 11 -9 अशा 3-1 ने फरकाने पराभूत करुन महाराष्ट्रास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरच्या सामन्यात महाराष्ट्राच्या राहुल बैठा याने सेनादलाच्या रणजीत सिंग याला 3-1 (11-9, 9-11, 11-6,11-4) मे पराभूत केले आणि महाराष्ट्राचा अंतिम सामन्यात खेळण्याचा प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाची कामगिरी शानदार होत आहे. उपांत्य फेरीत बलाढ्य सेनादलाच्या संघास नमवल्याने अंतिम फेरीत महाराष्ट्राचा संघ अधिक आत्मविश्वासाने खेळेल. अंतिम सामना बुधवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.
महिला गटात कांस्य पदक
महिला गटात महाराष्ट्राचा महिला संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने अप्रतिम कामगिरी नोंदवत उपांत्य फेरी गाठली होती.महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात उपांत्य सामना झाला. यात तामिळनाडू संघाने 2-0 अशा फरकाने सामना जिंकून अंतिम फेराी गाठली.
उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र महिला स्क्वॉश संघास कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या सामन्यात सुनीता पटेल आणि आरती पूजा हिचा सामना झाला. हा सामना आरती पूजाने 3-1 ने जिंकला. दुसऱ्या दुसऱ्या झालेल्या सामन्यात सुनेना कुर्वेला आणि उर्वशी जोशी यांच्यामध्ये पाच सेटमध्ये सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम उर्वशी जोशीने 11-9, 11-9 त्यानंतर सोने नाणे कमबॅक करत 9-11, 12-14 आणि 8 -11 अशा फरकाने सामना जिंकला.या कामगिरीबद्दल महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक डॉ. प्रदीप खांडरे, प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.