महाराष्ट्राच्या अवंतिका चव्हाण हिने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर २६.५४ सेकंदात पार केले. या शर्यतीमधील प्राथमिक फेरीत माना पटेल हिने हे अंतर २६.६० सेकंदात पार केले होते आणि विक्रम नोंदविला होता. अवंतिका ही मुंबई येथील खार जिमखाना येथे ऑलिंपिकपटू वीरधवल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
जलतरण शर्यतीत पलक जोशी ब्रॉंझ पदकाची मानकरी
पलक जोशी हिने महिलांच्या दोनशे मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत ब्रॉंझ पटकाविले. तिला हे अंतर पूर्ण करण्यास दोन मिनिटे २५.०९ सेकंद वेळ लागला. मुंबईची खेळाडू पलक हिने या आधी या स्पर्धेत चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून दिले होते. पलक ही नवी दिल्ली येथे पार्थ मुजुमदार यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. दोनशे मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत गुजरातच्या माना पटेल व पश्चिम बंगालची शुभ्रती मोंडाल यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले.