16 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना

औरंगाबाद(प्रतिनिधी): दिनांक 25 ते 28 मार्च 2022 या दरम्यान गोपालन स्पोर्ट्स सेंटर, बेंगलोर येथे होणाऱ्या 16 व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा संघ नुकत्याच जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून निवडण्यात आला होता. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, पिंपरी-चिंचवड, जळगाव येथील खेळाडूंची निवड झालेली आहे. यातील निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे एकत्रित राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर बुलढाणा जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेने दिनांक 19 ते 23 मार्च दरम्यान शेगाव येथे आयोजित केले होते.

सदरील स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ नॅशनल डेव्हलपमेंट, एज ग्रुप, जूनियर व सीनियर अशा चार वयोगटात पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, तिहेरी, समूह व एरो डान्स या सादरीकरण प्रकारात सहभागी होणार आहे.सदरील संघ दिनांक 24 मार्च रोजी बेंगलोर साठी रवाना झाला. संघासोबत प्रशिक्षक म्हणून हर्षल मोगरे ,सर्वेश भाले, आणि हर्षद कुलकर्णी तसेच संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.निलेश जोशी आणि दिपाली बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदरील स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष  संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, एरोबिक जिम्नॅस्टिक्स तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, बुलढाणा जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष कुमारी कविता पाटील, सचिव राहुल पहुरकर, कोषाध्यक्ष दर्शन तराळे, संत गजानन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत पाटील, प्राचार्य डॉ. सोमाणी यांनी शुभेच्छा दिल्या.

संघ खालील प्रमाणे :-

नॅशनल डेव्हलपमेंट गट
आर्यन फुले, अक्षया कलंत्री, ओम सोनी, अद्वैत काचेवार, इशिका बजाज, सृष्टी खोडके, सर्वज्ञ बिंदू, सर्वज्ञ कनकदंडे, ऋतुराज वाघ, प्रज्वल अंभोरे, गौरी पाते.

सब ज्युनियर गट
अनिकेत चौधरी, गौरी ब्राह्मणे, विश्वेश पाठक, अनुराग देशमुख , गीत भालसिंग, रिया नाफडे, सानवी सौंदळे, साची इंगळे, उत्कर्ष सोनार, अनुष्का लूनावत, अन्वी पाटील, परिजा क्षीरसागर.

ज्युनियर गट
आर्य शहा, राधा सोनी, स्मिथ शहा, अद्वैत वझे, देवेश कातनेश्वरकर, सायली वझरकर, दीपक अर्जुन, विश्वेश जोशी, संकेत चिंतलवाड, रमण सिंगीतम, साईदीप मटपल्लू, गार्गी चौधरी.

वरिष्ठ गट
गौरव जोगदंड, रिची भंडारी, ऋग्वेद जोशी , साक्षी लड्डा, धैर्यशील देशमुख, संदेश चितलवाड, अभय उंटवाल, उदय मेधेकर, साक्षी डोंगरे, सिल्वी शहा, उदय मधेकर, राम अर्जुन, प्रेम बनकर, विजय इंगळे, सुधन्व बोर्डे.

You might also like

Comments are closed.