नवी दिल्ली – 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ट्रॅक सायकलिंग खेळाच्या स्पर्धांना आज नवी दिल्ली येथील आय. जी. स्टेडियम मधील वेलोड्रमवर सुरुवात झाली. स्पर्धेचे उदघाटन केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याच्या सचिव सुजाता चतुर्वेदि यांच्या हस्ते झाले याप्रसंगी सीएफआईचे महासचिव मनेंदर पाल सिंग आणि सी एफ आय चे खजिनदार प्रताप जाधव उपस्थित होते.
महाराष्ट्राला सायकलिंग मधील पहिले पदक आज मयुरी लुटे या आंतरराष्ट्रीय खेळाडूने मिळून दिले. 500 मीटर महिलांच्या टाईम ट्रायल प्रकारात 36.837 सेकंद वेळ नोंदवताना तिने कास्यपदक पटकावले या प्रकारात पश्चिम बंगालच्या त्रिषा पॉल हिने सुवर्णपदक पटकावताना 35.666 सेकंद वेळ नोंदवली तर मणिपूरच्या एम सोनाली चानू हिने रौप्य पदक मिळवताना 36.60 सेकंद वेळ दिली
1 ऑक्टो 2022, पदक विजेते खेळाडू :
नेमबाजी : अभिज्ञा पाटील (कांस्यपदक)
कबड्डी : महाराष्ट्र महिला संघ (राैप्यपदक)
महाराष्ट्र पुरुष संघ (राैप्यपदक)
बाेर्ड स्केटिंग : {श्रुती भोसले (सुवर्णपदक) ऊर्मिला जितेंद्र पाबळे (राैप्यपदक)
शुभम सुराणा (राैप्यपदक) निखिल शेलटकर (कांस्यपदक)
तलवारबाजी : {अजिंक्य दुधारे (कांस्यपदक)
{गिरीश जकाते (कांस्यपदक)
ॲथलेटिक्स : ऐश्वर्या मिश्रा (सुवर्णपदक)
दियांद्रा (कांस्यपदक) संजीवनी जाधव (कांस्यपदक)
महाराष्ट्र पुरुष रिले संघ (कांस्यपदक)
कुस्ती : समीर पाटील (कांस्यपदक)
टेनिस : महाराष्ट्र पुरुष संघ (सुवर्णपदक)
महाराष्ट्र महिला संघ (राैप्यपदक)
सायकलिंग : मयूरी लुटे (कांस्यपदक)