बडोदा- आज रिदमीक जिम्नास्टिकच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट किताबाच्या अंतिम स्पर्धा झाल्या. यात महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व गाजवत एक सुवर्ण व एक रौप्यपदक प्राप्त केले. खेलो इंडिया मध्ये अव्वल ठरलेली संयुक्त काळे (ठाणे) हिने काल झालेल्या प्राथमिक फेरीमध्ये सर्व खेळाडूंवर आघाडी मिळवली होती, ती कायम राखत रिबन, क्लब, बॉल आणि हूप या चार साधनांवर उत्कृष्ट कामगिरी करून 101. 65 गुण मिळवत सुवर्ण पदक जिंकले.
महाराष्ट्राच्याच रिचा चोरडियाने संयुक्ताला कडवी लढत देत 99.15 गुण मिळवत रौप्य पदक प्राप्त केले. जिम्नास्टिक्स मध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्ण, एक रौप्य, व चार कास्यं पदके जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. जिम्नॅस्टिक मध्ये एकूण आठ पदके महाराष्ट्राने मिळवली.
रिचा चोरडीयाला कल्याणी तांबे हीचे मार्गदर्शन लाभले. तर संयुक्ता काळेला पूजा सूर्वे हीचे मार्गदर्शन मिळाले.महाराष्ट्राच्या या उत्कृष्ट कामगिरी साठी संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे सचिव डॉ. मकरंद जोशी यांनी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षण यांचे अभिनंदन केले.