औरंगाबाद(प्रतिनिधी): २६ मार्च व २७ मार्च २०२२ बेंगलोर (कर्नाटका) या ठिकाणी झालेल्या १६ व्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने सर्वसाधारण विजेतेपदासह ११ सुवर्ण,०५ रौप्य,०५ कास्य पदकांची कमाई केली. महाराष्ट्रानंतर मणिपूर संघाने चार सुवर्ण दोन रौप्य पदके तर सेनादलाने तीन सुवर्ण, एक रौप्य तर प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सर्व वयोगटात विजयी ठरला.
स्पर्धा चार वयोगटांमध्ये घेण्यात आल्या होत्या. नॅशनल डेव्हलपमेंट,सब ज्युनियर ,ज्युनियर व वरिष्ठ गट या सर्व वयोगटांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. मकरंद जोशी यांची स्पर्धा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अमेय जोशी, सिद्धार्थ कदम,निलेश जोशी,निशा महाजन,संदीप लटपटे,वेदांत मुढे यांनी पंच म्हणून यांनी काम पाहिले. या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून हर्षल मोगरे,.सर्वेश भाले, हर्षद कुलकर्णी हे गेले होते.तसेच संघ व्यवस्थापक म्हणून मनीष थट्टेकर दिपाली बजाज या होत्या.
एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स अमॅच्युअर संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष ॲड. संकर्षण जोशी, उत्तम लटपटे,सचिव डॉ.मकरंद जोशी,कोषाध्यक्ष पवन भोईर, सहसचिव बालाजी मुंढे, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे तांत्रिक समिती सदस्य डॉ.आदित्य जोशी तसेच सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे,रोहित रोंगे,संदीप गायकवाड,राहुल तांदळे आदींनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
पदक विजेता संघ खालीलप्रमाणे:-
नॅशनल डेव्हलपमेंट गट
१) पुरुष एकेरी – रौप्य
आर्यन फूले
२) महिला एकेरी- सुवर्ण
श्रृष्टि खोडके
३) मिश्र दुहेरी- सुवर्ण
प्रज्वल अंबोरे व गौरी पाते
३) तिहेरी -सुवर्ण
सर्वज्ञ कनकदंडे, सार्वाध्य बिंदु व ऋतुराज वाघ
सब ज्युनियर गट
१)पुरुष एकेरी – सुवर्ण
अनिकेत चौधरी
२) महिला एकेरी – रौप्य
गौरी ब्राह्मणे
३) मिश्र दुहेरी- सुवर्ण
अनिकेत चौधरी व गौरी ब्राह्मणे
२)मिश्र दुहेरी- रौप्य
उत्कर्ष सोनार व साची इंगले
४) तिहेरी – रौप्य
परीजा क्षीरसागर, अन्वी पाटिल व अनुष्का लुकामत
२) तिहेरी – कास्य
विश्वेश पाठक, अनुराग देशमुख व गीत भालसिंग
५) ग्रुप – सुवर्ण
विश्वेश पाठक, अनुराग देशमुख, गीत भालसिंग, रिया नाफडे, व सानवी सौंदळे
ज्युनियर गट
१)पुरुष एकेरी – सुवर्ण
आर्य शहा
२) महिला एकेरी – कास्य
राधा सोनी
३) मिश्र दुहेरी – सुवर्ण
स्मिथ शहा
राधा सोनी
४) तिहेरी – सुवर्ण
स्मिथ शहा,अद्वैत वजे व देवेश कातनेश्वरकर
वरिष्ठ गट
१)पुरुष एकेरी – कास्य
गौरव जोगदंड
२) महिला एकेरी – कास्य
रिची भंडारी
३) मिश्र दुहेरी – सुवर्ण
ऋग्वेद जोशी व साक्षी लड्डा
४) मिश्र तिहेरी – कास्य
गौरव जोगदंड, धैर्यशील देशमुख व संदेश चितलवाड
५) ग्रुप – रौप्य
ऋग्वेद जोशी, धैर्यशील देशमुख , संदेश चितलवाड, अभय उंटवाल व उदय मेधेकर
६) ऐरो डान्स – सुवर्ण
ऋग्वेद जोशी, धैर्यशील देशमुख , संदेश चितलवाड, अभय उंटवाल, उदय मेधेकर, साक्षी लड्डा, रिची भंडारी व सिल्वी शहा