महेमदावाद,खेडा (गुजरात) येथे संपन्न झालेल्या 34 व्या राष्ट्रीय सबज्युनिअर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र मुलांच्या गटास रौप्य पदक तर मुलींच्या गटास कांस्य प्राप्त.या संघात औरंगाबाद च्या स्नेहल सूर्यवंशी,तेजस पांडेय,यश थोरात यांचा समावेश.अंतिम सामन्यात खेळताना राजस्थान संघाने 5 होमरन मारून जिंकण्यासाठी लक्ष्य दिले असता 6 होमरन ची आवश्यकता असताना महाराष्ट्र संघातर्फे एकट्या कर्णधार प्रशांत वनमने ह्याने होमरन मारून तीन रन काउंट करून सामना खुप जिंकण्याच्या परिस्थिती मध्ये आणून ठेवला पण शेवटी सामना हा राजस्थान संघानेच जिंकला..
मुले संघ खालीलप्रमाणे :
प्रशांत वनमने (कर्णधार), वैभव बारी, वेदांत राऊत, यश थोरात, सौरभ वानखेडे,रोशन राठोड, राज आढाव, परिमल चौखडे, यश चावरे, अनिरुद्ध सनेश्वर, तेजस पांडेय, मनन येवतिकार,रुकेश मून, आदित्य रावळ,पुष्पदंत, पाटील,दिशांत सोडमिसे यांचा समावेश होता.तत्पूर्वी मुलींच्या गटात तिसऱ्या पदकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्र संघाला आंध्र प्रदेश संघाने 6-3 होमरन च्या फरकाने हरविले. महाराष्ट्र मुलींच्या संघातर्फे कर्णधार अंजली पवार हिने पिचिंग करून विरोधी संघांचे खेळाडू बाद केले व काही प्रमाणात सामना अटीतटीच्या स्थितीत आणून ठेवला व हिंटिंग करताना सप्तश्री येवतिकार, अंजली पवार, जानवी वानखेडे,यांनी प्रत्येकी 1 होमरण मारून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला.
मुली संघ खालीलप्रमाणे:
अंजली पवार (कर्णधार), सानिका कांबळे, दिव्या ठाकरे, जानवी वाडेकर, विनिता पाटील, सप्तश्री येवतिकार, श्रवणी सावंत, साक्षी येटाळे, धनश्री चिंचोळे, भाविका बडगुये, प्राची गजभिये, प्रेरणा गायकवाड, तन्वी देशमुख, श्रुष्टि पाटील, स्नेहल सूर्यवंशी, सुचित्रा गोंधळी यांचा समावेश होता.अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून प्रसन्ना,प्रिन्स अहिवार, गोपाल सिंग स्कोरर म्हणून विकास वानखेडे हे होते.या संघाला अंतिम सामन्यासाठी प्रमुख मार्गदर्शन कल्पेश कोल्हे (जळगाव) संतोष आवचार (औरंगाबाद)विनय गोसावी (नाशिक)यांचे लाभले.
तसेच मुलांनी रौप्य व मुलींनी कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन चे डॉ.प्रदीप तळवेळकर व औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भाऊ पाथ्रीकर,उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे,सचिव गोकुळ तांदळे,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी डॉ.उदय डोंगरे,दीपक रुईकर,गणेश बेटूदे, सागर रूपवते,राकेश खैरनार,अक्षय बिरादार, सचिन बोर्डे, विजय सोनावणे, सुशील अंभोरे यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले….
मुलेचा अंतिम सामन्याचा स्कोर
राजस्थान वि. वि महाराष्ट्र (5-3 होमरन )
मुलींचा तृतीय पदासाठी सामन्याचा स्कोर
आंध्रप्रदेश वि. वि महाराष्ट्र (6-3 होमरन)