मागच्या काही काळापासून क्रिकेट या खेळाचा ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. परंतु आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने याबाबत निराशाजनक संकेत दिले आहेत. या कमिटीने २०२८ साली होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केलेला नाही. कमिटीच्या या निर्णयानंतर क्रिकेटच्या चाहत्यांनी निराशा झाली आहे. आता आयसीसीने ऑलिम्पिक कमिटीने घेतलेल्या या निर्णयासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अशात आयसीसी येत्या काळात क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील असेल, अशी माहिती मिळाली आहे
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीनेच्या कार्यकारी बोर्डने आगामी २०२८ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर २८ नवीन खेळांचे प्रकार सुचवले आहे, ज्यांचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश केला जाऊ शकतो. बोर्डने सुचवलेल्या खेळांमध्ये स्केटबोर्डिंग, क्लाइम्बिंग आणि सर्फिंग यासारख्या खेळांचा समावेश आहे, परंतु या २८ खेळांमध्ये क्रिकेटच्या नावाच समावेश नाही. यानंतर चाहते निराश असले तरी, आयसीसीने मात्र याबाबत निराश नाही. आयसीसीच्या मते २०२८ ऑलिम्पिकसाठी अजून अवकाश आहे आणि यादरम्यान ते पूर्ण प्रयत्न करतील की, क्रिकेटचा देखील ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा.
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याबाबत आयसीसीच्या अपेक्षा कायम
ऑलिम्पिक कमिटीच्या या निर्णयानंतर आयसीसीच्या एका संचालकाने यासंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. हे अधिकारी एका मुलाखतीत याबाबत बोलले आहेत. यावेळी ते म्हणाले की, “अजून खूप वेळ बाकी आहे. आम्ही त्या दिशेने योग्य प्रकारे पुढे चाललो आहोत आणि ऑलिम्पिकसंदर्भात आमच्या महत्वकांक्षेत बदल झालेला नाहीय.”
आयसीसी व्यतिरिक्त बीसीसीआयकडून देखील ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याबाबत महत्वाची प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार आता आयसीसीवर सर्व गोष्टी अवलंबून असतील की, पुढचे पाऊल काय असेल. ते अधिकारी म्हणाले “आयओसीने दबाव आणल्यामुळे आम्ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी आमची मंजूरी दिली. आता सर्वकाही त्यांच्यावर अवलंबून असेल.”