पुणे – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे चे आयुक्त सुहास दिवसे यांनी अधिकृत राज्य क्रीडा संघटनाची माहिती सादर करणेबाबत महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांना दिनांक 18 नोव्हेंबर 2022 तसेच 16 नोव्हेंबर 2022 व 9 डिसेंबर 2022 ला असे 3 पत्र क्रीडा आयुक्त यांनी MOA ला पाठवले त्यात बास्केटबॉल, वॉलीबॉल, कयाकिंग व कनोईग, तायक्वांदो, कराटे व किकबॉक्सिंग या खेळांचे अधिकृत राज्य संघटना बाबत वाद असल्याने क्रीडा सुविधा देतांनी संचालनालाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्या अनुषंगाने क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी उपरोक्त सहा क्रीडा प्रकारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला माहिती मागितलेली आहे की अधिकृत राज्य क्रीडा संघटना कोणती, परंतु आयुक्तांनी दोन ते तीन पत्र पाठवून सुद्धा आज तारीख 15 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन चे सचिवांनी माहिती दिलेली नाही, क्रीडा आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवून स्वतः नामदेव शिगावकर क्रीडा आयुक्तांपेक्षा स्वतःला मोठे समजून कार्य करत आहेत, मी बोलेन तो कायदा असे दिसून येत आहे.
याबाबत क्रीडा संचनालयाचे अनेक अधिकारी शिरगावकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शेगावकर हे एकेरी कारभार करत असल्याचे उघड झाले आहे, एका संघटनेला आईचा तर दुसऱ्या संघटनेला बापाचा अशा प्रकारे नामदेव शिरगावकर यांनी महाराष्ट्रात करून ठेवलेला आहे, ज्या राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता आहे त्यास सलग्न राज्य क्रीडा संघटनेला महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन नी संलग्नता द्यावे हा नियम MOA चा आहे मात्र अनेक राज्य क्रीडा संघटना ज्या राष्ट्रीय संघटनेत सलग्न आहेत त्यांना इंडियन ऑलिंपिक असोसिएशनची मान्यता नाही तरीसुद्धा महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन ने आपला स्वतःचा नियम धाब्यावर ठेऊन महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशनची मान्यता देऊन सचिव शीगावकर यांनी स्वतःच्या मर्जीने कोणतेही डॉक्युमेंट चे पडताळणी न करता स्वतःच्या मर्जीने संलग्नता दिले व तसे क्रीडा संचलनालयला सुध्दा कळविले की मिनी ओलंपिक व शालेय क्रीडा स्पर्धा त्यांच्या तांत्रित सहकार्याने घ्यावे असे पत्र स्वतःच्या मर्जीने दिले त्यामुळे कित्येक महाराष्ट्राच्या खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे, याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शेगावकर हे आहेत, दिनांक 13 डिसेंबर 2022 पर्यंत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव यांनी उपरोक्त सहा क्रीडा प्रकरणी अधिकृत राज्य क्रीडा संघटनेविषई माहिती न दिल्यास क्रीडा आयुक्त यांनी स्वतः निर्णय घेऊन पुढील कारवाई करू असे आदेश महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनला दिले तसेच याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची असेल असे 9 डिसेंबर 2022 च्या पत्रात माननीय क्रीडायुक्त यांनी नमूद केले आहे,
आता तरी माननीय आयुक्त यांनी सहा खेळ वादग्रस्त आहेत या विषयी महाराष्ट्र ऑलिम्पिकला कळविले आहे, त्यामुळे कृपया महाराष्ट्रातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी अधिकृत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संघटनेचे पात्र पंच किंवा जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांच्या सहकार्याने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करावे असे महाराष्ट्रातील तमाम क्रीडा प्रेमींचे व खेळाडूंनी आवाहन केले आहे.