संभाजीनगर(प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी व मनपा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 19 वर्षा आतील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धा नुकत्याच गरवारे क्रीडा संकुल औरंगाबाद येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत अंतिम सामना एसबीओए विरुद्ध देवगिरी महाविद्यालय यात झाला यात एसबीओ संघावरती देवगिरी महाविद्यालयांच्या मुलींच्या संघाने 86 धावांनी दणदणीत विजय मिळवला यशस्वी स्पर्धक मुली दिव्या देवीदास धांडे ,भूमिका बाळकृष्ण चव्हाण ,गायत्री अजय माईंड ,समृद्धी शिवाजी तिडके ,रेणुका दिनेश मुळे अंजली अनिल नाईक ,अश्विनी न्यानेश्वर धुमाळ, अमृता उमेश शिंदे सुहाणी सुभाष पवार, पूजा रतनलाल जमदाडे, साक्षी राजेशसिंग कुशवाह, प्रियंका सुरेश गौड ,अलका रमेश अन्वेकर, ट्विंकल महेश तहिल रामाने, समीक्षा बाळासाहेब साळुंके, मोक्षा जयचंद्रन इत्यादी या स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस माननीय आ.सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्ष ,एडवोकेट मोहनराव सावंत,मा. त्र्यंबकराव पाथ्रीकर ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक. व्ही .तेजनकर, उपप्राचार्य नंदकिशोर गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने, उपप्राचार्य विजय नलावडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक राकेश खैरनार, प्राध्यापक अमोल पगारे, प्राध्यापक आमीन शाह, प्राध्यापक मंगल शिंदे, प्राध्यापक अविनाश वाडे,प्राध्यापक कृष्णा दाभाडे यांची मार्गदर्शन लाभले