जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम घालावा लता लोंढे यांची मागणी

औरंगाबाद(प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर केला जात असून व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास निधी खर्च करताना कार्यालयास विचारात न घेता आपले पती व इतरांची नियमांस सोडून मदत घेत असल्याचे निवेदन क्रीडा अधिकारी लता लोंढे यांनी शासन, प्रशासनाकडे पाठवले आहे.

संघटनांना अनुदान देण्यात कार्यालयातील कर्मचारी काम करत नव्हते, म्हणून बाहेरच्या लोकांची मदत घेतली, पेपरबाजी टाळण्यासाठी आपण असे केल्याचे नावंदे यांनी म्हटले आहे. त्या आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास देऊन त्यांची फाईल तयार करत आहेत.

तालुका क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, चंद्रशेखर घुगे, लता लोंढे ,पंडित चव्हाण अशा कर्मचाऱ्यांना अनुदान वाटप आणि क्रीडांगण विकास निधी खर्च करण्याबाबत नावंदे यांनी कोणत्याही स्वरूपाचे अधिकार दिले नाहीत.कोरोनाचया कालावधीत कोणत्याही स्पर्धा झाल्या नाहीत, तेव्हा प्रशासकीय स्तरावर जिल्हा नियोजन मंडळाकडे अनुदान योजना प्रस्ताव आणि तपासणी करणे शक्य होते, मात्र केवळ निधी खर्च करण्याच्या नावे नावंदे यांनी त्याचे अनियमित वाटप केले. संघटनांची तपासणी न करता आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर डावलत त्यांनी कामे केली आहेत,असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

 

लता लोंढे (तालुका क्रीडा अधिकारी)

जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे ह्या आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवून मानधनावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतात. व्यायामशाळा विकास अनुदान आणि क्रीडांगण विकास अनुदानासाठी अशाच पद्धतीने निधी खर्च करण्यात आला, एकप्रकारे कर्मचाऱ्यांना हेतुपुरस्सर डावलत आहे, त्यांची उच्चस्तरीय चौकशी केली जावी.

 

 

नियमांत काम केले

कविता नावंदे ( जिल्हा क्रीडा अधिकारी)

आपण पेपरबाजी करण्यात वेळ न घालवता नियमानुसार काम केलेले आहे, बेशिस्तपणे वागणार्या कर्मचाऱ्यांना कामातील चुकांबाबत जाणीव करून दिली असून प्रशासकीय कारभार अधिक पारदर्शकपणे करत आहे.

 

 

ओमप्रकाश बकोरिया (महाराष्ट्र क्रीडा आयुक्त )

औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, नियमांत कुणी वागत नसेल तर उपसंचालकांना चौकशी अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत

 

सुहास पाटील (विभागीय क्रीडा उपसंचालक औरंगाबाद)

तालुका क्रीडा अधिकारी लता लोंढे यांचे पत्र प्राप्त झाले आहे, याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार तपासणी करून अहवाल सादर केला जाईल.

You might also like

Comments are closed.