पुणे:- श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धा 2022- 23 मधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात आज झालेल्या वैयक्तिक साधन प्रकारातील विजेतेपद स्पर्धेमध्ये क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवत सुवर्णपदकांची लयलूट केली.
काल झालेल्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट किताबाच्या विजेतेपद स्पर्धेमध्ये क्रीडा प्रबोधिनीच्या श्रद्धा तळेकरने महिलांत तर पुरुषांमध्ये ॐकार धनावडे यांनी सर्वोत्कृष्ट किताबाचा मान मिळवला होता. आज सकाळच्या सत्रात झालेल्या रदमिक जिम्नॅस्टिक्सच्या सर्वोत्कृष्ट वैयक्तिक विजेतेपदाच्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या रिचा चोरडिया 100.60 हीने चारही साधन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याच्या किमया काळे 100.25 हिच्यावर मात करत सुवर्णपदक पटकावले. संयुक्ता काळे रौप्य तर मुंबईच्या अनन्या सोमण 85.30 हिला कांस्यपदक मिळाले.
विजेत्यांना डॉ. सुहास दिवसे आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, चंद्रकांत कांबळे सहसंचालक यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी संजय शेटे अध्यक्ष महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन व सचिव डॉ. मकरंद जोशी हे उपस्थित होते.
महिलांचे साधन प्रकारातील अंतिम विजेते खेळाडू.
टेबल व्हाॅल्ट
1. श्रद्धा तळेकर क्रीडा प्रबोधिनी पुणे 12.00
2. इशिता रेवाळे मुंबई उपनगर 11.45
3. शताक्षी टक्के पुणे 11.32
अनईव्हन बार्स
1. श्रद्धा तळेकर क्रीडा प्रबोधिनी पुणे 10.07
2. उर्वी वाघ, पुणे 8.37
3. सुहानी अदने, साई औरंगाबाद 8.30
बीम
1. श्रद्धा तळेकर, क्रीडा प्रबोधिनी पुणे 10.33
2. रीया केळकर, पुणे,10.17
3. इशिता रेवाळे, मुंबई उपनगर,10.03
फ्लोअर
1. श्रद्धा तळेकर क्रीडा प्रबोधिनी पुणे 10.93
2. इशिता रेवाळे, मुंबई उपनगर,10.73
3. मानसी देशमुख, क्रीडा प्रबोधिनी पुणे 9.90
पुरुषांचे साधन प्रकारातील अंतिम विजेते खेळाडू.
फ्लोअर
1. ओमकार धनवडे क्रीडा प्रबोधिनी पुणे 13.00
2. आर्यन केळकर मुंबई शहर 12.00
3. सार्थक राऊळ मुंबई उपनगर 11.90
पाॅमेल हाॅर्स
1. रुपेश बांदल क्रीडा प्रबोधिनी पुणे 11.73
2. मनीष गाढवे ठाणे 11.37
3. सार्थक राऊळ मुंबई उपनगर 11.17
रींग्ज
1. करण खरटमल साई औरंगाबाद 12.07
2. मानस मनकवले ठाणे 11.97
3. प्रसाद सांगळे नाशीक 11.83
टेबल व्हाॅल्ट
1. ओंकार धनवडे क्रीडा प्रबोधिनी पुणे 13.13
2. सार्थक राऊळ मुंबई उपनगर 12.68
3. आकाश धुवाळी मुंबई शहर 12.35
पॅरलल बार्स
1. निशांत करंदीकर मुंबई उपनगर 12.37
2. मानस मनकवले ठाणे 12.33
3. आकाश धुवाळी मुंबई शहर 11.93
हाॅरीझंटल बार
1. मेघ रॉय मुंबई उपनगर 11.20
2. मनीष गाढवे ठाणे 11.10
3. आर्यन नहाते साई औरंगाबाद 11.00
मान्यवरांनी विजय खेळाडूंना पदक देऊन सन्मानित केले. कर्नल प्रमोद दहितूले बिजनेस हेड बँक ऑफ महाराष्ट्र, धनंजय भोसले खजिनदार महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन, अमित गायकवाड, अध्यक्ष मॉडर्न पॅंटेथेलाॅन, सुधीर मोरे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, संजय शेटे ,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक्स असोसिएशन, डॉक्टर मकरंद जोशी सचिव महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन, संजीवनी पूर्णपात्रे, प्रवीण ढगे, योगेश शिर्के, अजीत जरांडे, अक्षता शेटे, वर्षा उपाध्ये,मंदार म्हात्रे आदींनी पदक देऊन खेळाडूंचे अभिनंदन केले.