औरंगाबाद:- महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा सहसंचालकपदी मराठवाड्याचे सुपुत्र चंद्रकांत कांबळे यांची पदउन्नती झाल्या नंतर प्रथमच औरंगाबाद नगरीत आगमना निमित्त कांबळे यांचा सत्कार समारंभ शनिवार २१ ऑगस्ट ला, दुपारी १२:३० वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व खेळाडूंनी, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांनी, ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थिस राहावे,अशी विनंती औरंगाबाद ऑलिम्पिक अस्सोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.