वेटलिफ्टिंग मध्ये कोमलची सोनेरी कामगिरी

अहमदनगर ची खेळाडू कोमल वाकळे हिने ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले आणि वेटलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्रास सोनेरी कामगिरी मिळवून दिली. तिने स्नॅच मध्ये ९४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले. स्नॅच मध्ये ती दुसऱ्या स्थानावर होते मात्र क्लीन व जर्कमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक खेचून आणले.

ती पाथर्डी येथील ख्यातनाम प्रशिक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. कोरोना महामारीच्या काळापूर्वी ती मुंबई येथे परमजीत सिंग व धनाजी पाटील यांच्याकडे सराव करीत होती. तिने यापूर्वी वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण, तीन रौप्य व एक ब्रॉंझपदक अशी कामगिरी केली आहे.

वेटलिफ्टिंग मध्ये कोमलची सोनेरी कामगिरी

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भरपूर कष्ट करण्याची आणि त्या करण्याची माझी तयारी आहे असे ३१ वर्षे खेळाडू कोमल हिने सांगितले.

You might also like

Comments are closed.