धारदार आक्रमण आणि अचूकता याच्या जोरावर महाराष्ट्राने हॉकी स्पर्धेतील पुरुषांच्या गटात यजमान गुजरात संघाचा २०-१ असा धुव्वा उडविला.
महाराष्ट्राकडून युवराज वाल्मिकी व तालेब शेख यांनी प्रत्येकी पाच गोल केले तर वेंकटेश केचे याने चार गोल नोंदविले. देवेंद्र वाल्मिकी यांनी दोन गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. हे सामने राजकोट येथे आयोजित करण्यात आले आहेत.