प्रतिनिधी-आज आयपीएल मध्ये सुपर संडे मध्ये मुंबईसमोर बेंगलोर आव्हान असणार आहे तर यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.आरसीबी कडून कर्णधार विराट कोहली व अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके ठोकली आहेत.
तर मुंबईकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तीन गडी बाद केले आहे. आज मुंबई मध्ये स्टार खेळाडू हार्दिक पांड्या ची वापसी झाली आहे. आता आता मुंबई समोर 166 धावांचे आव्हान असणार आहे.
नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. डावाच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहणे देवदत्त पडीक्कलला शून्यावर बाद केले.त्यानंतर कर्णधार विराट कोहली व भारत ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नंतर मॅक्सवेलने कर्णधार कोहलीला चांगली साथ दिली. अर्धशतकी खेळी करून दोघे फलंदाज तंबूत परतले.नंतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी न केल्यामुळे बेंगलोरला 165 धावावरच समाधान मानावे लागले. मुंबईने सलग दोन सामने गमावले आहेत त्यामुळे त्यांना जिंकणे आवश्यक आहे.