पंचकूला(प्रतिनिधी): हरियाणा येथे होत असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत तिसऱ्या दिवशी रिदमिक जिम्नॅस्टिक्स या प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने पाच सुवर्णपदके पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले तिला महाराष्ट्राच्याच किमया कारले एक रौप्य एक कास्य व निशिका काळे तिने एक रोपे एक कास्यपदक पटकावत रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये महाराष्ट्राला तोड नाही हे सिद्ध केले.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स या प्रकारात महाराष्ट्राने दोन रोग योग्य तीन कास्य पदके पटकावली तर रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये पाच सुवर्ण दोन रौप्य व दोन कास्य अशा पथकांची लयलूट केली.संयुक्ता काळे हिने खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये रिदमिक जिम्नास्टिक्स सर्वसाधारण सर्व साधनांवर सुवर्ण तर वैयक्तिक सर्वोत्कृष्ट जिम्नास्ट स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. मुक्ता काळे ही ठाणे येथे मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आहे.
महाराष्ट्राच्या पदक तालिकेत तीन पथकांची भर. बॅलेंसिंग बीम वर रिद्धी हट्टेकरने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. तर फ्लोअर एक्सरसाइज या प्रकारात इशिका रेवाळे (ठाणे) रौप्य पदक व रिद्धी सत्तेवरून (औरंगाबाद) कास्य पदक मिळवले. महाराष्ट्राला 5 सुवर्ण सहा रौप्य तर सात कास्यपदके मिळाली.
जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी यांनी सर्व प्रशिक्षक व पदक विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.