औरंगाबाद (प्रतिनिधी)औरंगाबादचा युवा स्टार खेळाडू जावेद पटेल राष्ट्रीय वरिष्ठ पुरूष गट हॅण्डबाॅल स्पर्धेत औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करणार आहे.जयपूर येथे २० ते २५ मार्चदरम्यान राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. फुरसुंगी (पुणे) येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत जावेदने उत्तम कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांला महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले.
यापूर्वी त्याने आसाम येथे ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने शालेय शिक्षण वेरुळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर, महाविद्यालयीन शिक्षण खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालय आणि सध्या तो विद्यापीठात एम.पी.एड करत आहे. त्याला प्रशिक्षक आशिष कान्हेड व वैभव किरगत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे सचिव तथा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा.एकनाथ साळुंके, डाॅ. संजय मोरे, डाॅ. उदय डोंगरे, रणजीत पवार, गणपत पवार, डाॅ. महमंद आरीफ, रेखा साळुंके, गोकुळ तादंळे, अभिजीत साळुंके, सागर तांबे, डी.आर. खैरनार, गणेश बेटूदे, सतीश पाठक, प्रा.उदय तगरे यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.