जालना(प्रतिनिधी)- जिल्हा आणि साई काने अकादमीचा प्रतिभावंत क्रिकेट खेळाडू शोएब सय्यद याची 28 सप्टेंबर पासून दिल्लीमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या विनू मांकड़ ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. शोएब सय्यद हा जालन्यातील मोंढ्यात हमाली करून आपल्या क्रिकेटच्या हुणर ला चालना देत गेला. शोएब सय्यद तथा त्यांच्या परिवाराने अत्यंत कठीण परिस्थितीतून हे कामगिरी पार पाडली आहे. त्याला त्याच्या कठीण परिश्रमाचे फळ मिळाले आहे. त्याने आपल्या कामगिरीने जालना शहरात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. विजय झोल नंतर शोएब सय्यद हा विनू मांकड़ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
त्याची आता महाराष्ट्रात निवड जालनेकरांच्या आशा पल्लवित झाली आहे.भविष्यात हा मुलगा भारताच्या सीनियर संघात खेळताना दिसेल अशी जालनेकरांना आशा आहे. शोएब हा डावखुरा तेज गोलंदाज आहे. तो रेल्वे ग्राउंडवर दररोज सराव करतो. विशेष म्हणजे तो हमाली करून क्रिकेटसाठी वेळ काढतो. शोएब सय्यद यास प्रशिक्षक राजू काने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच तो बालपणापासून त्यांच्या कोचिंग मध्ये शिकत आहे.
तसेच जालना क्रिकेट संघाचे अध्यक्ष एडवोकेट नरेंद्र देशपांडे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या यशाने शहरभरातून तसेच मित्र परिवार यांच्यावतीने त्याचे कौतुक व सत्कार होत आहे. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह राजकीय मंडळींनी ही त्याचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.