मुंबई | आयपीएल २०२२ च्या १०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या आणि दिल्लीला १७२ धावांचे लक्ष्य दिले. मात्र, दिल्लीच्या संघाला निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १५७ धावाच करता आल्या.मात्र या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये असे काही घडले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जोडपे कॅमेऱ्यात कैद झाले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कपल किस करताना कॅमेरात कैद झाले. त्याचा फोटो सोशल मीडियावर येताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यात जबरदस्त सामना सुरू असताना दोन्ही संघांचे खेळाडू जिंकण्यासाठी मेहनत घेत होते. दुसरीकडे स्टेडियममध्ये बसलेले हे जोडपे एकमेकांना किस करण्यात व्यस्त दिसले.
This couple took the IPL Match to next level😂 #DCvsGT #IPL2022#PuneCouple
Lagta h Oyo ke price high chal rhe Pune me😂 pic.twitter.com/skiQQpCdNV
— Dhananjay Jha (@DhananjayHans) April 2, 2022
या जोडप्याचे किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. भारतात पहिल्यांदाच ‘किस कॅम’ची ही कृती झाली आहे. दुसऱ्या देशात सामन्यादरम्यान जोडप्यांवर कॅमेरा गेल्यावर त्यांना किस करावे लागते असा ‘किस कॅम’ नावाचा प्रकार आहे. भारतात असा प्रकार किंवा असे दृश्य याआधी कधीही टिपले गेले नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.