पुणे | डबल हेडरचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सचा आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. सलामीवीर फलंदाज शुबमन गिलच्या (८४) अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. ज्याचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० ओव्हरमध्ये केवळ १५७ धावा करू शकला आणि गुजरातने १४ धावांनी स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.
गुजरातच्या (GT vs DC) फलंदाजीत शुबमन गिलने (shubman gill) अप्रतिम खेळी केली. तर गोलंदाजीत दिल्लीच्या मुस्तफिजुरने ३ विकेट्स घेत गुजरातच्या वेगवान धाव गतीला ब्रेक लावला. ज्यामुळे ज्यामुळे शुबमन आणि हार्दिक वगळता दुसरे फलंदाज विशेष कामगिरीत करू शकले नाहीत. गुजरातच्या १७२ चा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीचे सलामीवीर अगदी सुरुवातीलाच लवकर बाद झाले. ज्यानंतर कर्णधार ऋषभने संघाला तारले.
ऋषभ पंतने (rishabh pant) २९ चेंडूत ४३ धावा केल्या. ज्यात ७ चौकारांचा समावेश होता. मात्र गुजरात प्रमाणेच दिल्लीचीही फलंदाजी ढासळताना दिसली. गुजरात कडून वेगवान फलंदाज लॉकी फर्ग्युसनने (lockie fergueson) ४ विकेट्स पटकावल्या. गुजरातच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाजी तग धरू शकली नाही. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर लाईट यादव आणि पॉवेलने खेळी सांभाळण्याचे प्रयत्न केले मात्र तेही गुजरातच्या गोलंदाजीवर बाद झाले. सामन्यात एकूणच अप्रतिम कामगिरी करत गुजरातने नवखे असूनही स्पर्धेत येताच आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.
.@gujarat_titans win by 14 runs and register their second win in #TATAIPL 2022.
Scorecard – https://t.co/onI4mQ4M92 #GTvDC #TATAIPL pic.twitter.com/Fy8GJDoXTL
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
गुजरातचा डाव
मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी गुजरातसाठी सलामी दिली. मागच्या सामन्यात खातेही उघडता न आलेल्या शुबमनने या सामन्यात दमदार फंलदाजी केली. वेडला (१) मात्र मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने वेडला यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या विजय शंकरलाही (१३) जास्त काही करता आले नाही. कुलदीप यादवने त्याला तंबूत धाडले. गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने शुबमनला साथ दिली. या दोघांनी संघाला शतकी पल्ला गाठून दिला. हार्दिकने ४ चौकारांसह ३१ धावा केल्या. खलील अहमदने त्याला बाद केले. शतकाकडे कूच करणारा शुबमन १८व्या षटकात माघारी परतला त्याने ६ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावा केल्या. मुस्तफिजूरने शेवटच्या षटकात जास्त धावा न देता गुजरातच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्याने ४ षटकात २३ धावा देत ३ बळी घेतले. गुजरातने २० षटकात ६ बाद १७१ धावा केल्या. खलीलला २ बळी मिळाले.