IPL 2022 : सामन्यात पहिला नो बॉल टाकलेला उमेश यादव ठरला ‘प्लेयर ऑफ द मॅच’

मुंबई: आयपीएल २०२२ ची सुरुवात थरारक झाली आहे. श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघाने चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात भिडलेल्या चेन्नई आणि कोलकाताच्या सामन्याने आयपीएलची सुरुवात केली आहे. चेन्नईला ६ विकेट्सने परास्त करताना नाईट रायडर्सकडून उमेशने २ विकेट्स घेत ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला आहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या CSK vs KKR सामन्यात श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) कोलकात्यात पर्दापण करत कर्णधार म्हणून करत असलेल्या श्रेयसने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोलकात्याने अप्रतिम गोलंदाजी करत चेन्नईला १३१ वर परास्त केले. ज्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या उमेश यादवने (umesh yadav) २ विकेट्स पटकावल्या. विशेष म्हणजे त्याने या सामन्यात पहिला बॉल नो बॉल टाकला होता.

चेन्नईने दिलेल्या १३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताकडून सलामीवीर रहाणेने ४४ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे टॉसवेळी श्रेयस तो संघात आहे हेही विसरला होता. रहाणेनंतर नितीश राणाने चांगली खेळी केली. चेन्नईने दिलेल्या कमी धावांचे लक्ष्य आरामात पूर्ण केले. गेल्या वर्षी उपविजेते ठरलेल्या कोलकाताने चेन्नईला परास्त करत विजयाने आयपीएलची सुरुवात केली आहे.

You might also like

Comments are closed.