मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची सुरुवात झाली. कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात 15 व्या मोसमातील पहिला सामना खेळवण्यात आला. कोरोनानंतर चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याचीही परवानगी देण्यात आली. एकूण क्षमतेच्या 25 टक्के लोकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.
https://www.instagram.com/p/Cbkk6v3N1zA/?utm_source=ig_web_copy_link
क्रिकेट चाहत्यांच्या उत्साह हा आणखी द्विगुणीत झाला तो कॅमेरामॅनच्या परफेक्ट टायमिंगमुळे. सालाबादप्रमाणे यंदा अगदी पहिल्याच सामन्यात चाहत्यांना नव्या मिस्ट्री गर्लचं दर्शन झालं आहे. सामन्यादरम्यान कॅमेरामॅनच्या अचूक टायमिंगमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मिस्ट्री गर्लंच दर्शन झालंय. या मिस्ट्री गर्लचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.