मुंबई: IPL 2022 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. १५व्या हंगामाचा पहिला टॉस श्रेयस अय्यरने (shreyas iyer) याने जिंकला आहे. श्रेयसने फ्रॅंचाईचीसोबत पहिला टॉस जिंकून त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडेवर नाईट रायडर्सनी सुपर किंग्जला प्रथम फलंदाजीस बोलवले आहे. या सामन्यात पहिल्यांदाच कर्णधारपद मिळवलेल्या जडेजाला (ravindra jadeja) टॉस जिंकता आला नाही.
चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) १७-८ अशा फरकाने आघाडीवर आहे आणि एक सामना रद्द झाला आहे. अशा स्थितीत सीएसकेचे पारडे जड दिसत आहे. वानखेडेची खेळपट्टी लाल मातीची आहे. याचा अर्थ वेगवान गोलंदाजांसाठी पुरेसा बाऊन्स आणि कॅरी असेल, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल, पृष्ठभागावर वेगवान गोलंदाजांसाठी अतिरिक्त बाऊन्स आणि कॅरी त्यांना झटपट विकेट मिळवू शकतात. मात्र वानखेडे स्टेडियमची सीमा इतर स्टेडियमच्या तुलनेत लहान असल्याने या स्टेडियममध्ये मोठी धावसंख्या होताना दिसत आहे. प्रथम फलंदाजी करताना, या मैदानावर सरासरी धावसंख्या १८० ते १८५ पर्यंत असते.
प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज – रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (C), शिवम दुबे, एमएस धोनी (WK), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, राजवर्धन हंगरगेकर आणि अॅडम मिल्ने
कोलकाता नाइट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (C), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (WK), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती