इंडियन प्रीमियर लीग शनिवारपासून (२६ मार्च) सुरू झाली असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये सामना सुरु झाला आहे. सलग चौथ्या वर्षी आयपीएलचा उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडणार नवता , सरळ सामन्यांस सुरुवात होणार होता. तत्पूर्वी बीसीसीआय मागील वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके पटकावलेल्या काही खेळाडूंना सन्मानित करणार आहे येणार होते . बीसीसीआयने मागील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिस देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांना अजूनही सन्मानित करण्यात आले नव्हते.
आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यापूर्वी बीसीसीआय ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्याबरोबरच रोख बक्षिस देण्यात आले. बीसीसीआयच्या वतीने खेळाडूंमध्ये नीरज चोपडा (neeraj chopra), बजरंग पूनिया (Bajrang Punia), रवि दहिया आणि लवलीना बोरगोहेन या खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआय केकेआर आणि सीएसकेच्या सामन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोपडाला १ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले आहे. नीरजने भालाफेक या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. तो अभिनव बिंंद्रानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा दूसरा खेळाडू ठरला आहे.नीरजशिवाय रेसलर रवि दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. त्याला बीसीसीआयकडून ५० लाख रुपये बक्षिस मिळाले आहे. तसेच या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खाते खोलणारी महिला चॅम्पियन म्हणचे मीराबाई चानूला सुद्धा ५० लाख रुपये बक्षिस मिळाले आहे. तसेच बजरंग पूनिया, महिला मुक्केबाज लवलीना बोरगोहेन, बॅडमिंटनपटू पीवी सिंधू आणि भारतीय हाॅकी संघाला सुद्धा सन्मानित केले आहे.
तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हाॅकी संघ ऑलिम्पिकचा विजेता संघ ठरला आहे. संघाला १.२५ कोटी बक्षिस दिले आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्य पदांचा समावेश आहे.
बीसीसीआय यावर्षी आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्याचे आयोजन केले नाही. बोर्डाचे या कार्यक्रमामध्ये होणारे नुकसान पाहून हा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यासाठी बोर्डाला ३० ते ४० कोटींचा खर्च करावा लागतो. आता आयपीएलमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.