मुंबई: आयपीएल २०२२ चा थरार स्टाईलने सुरू झाला आहे. नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जडेजा सोबत फलंदाजीस उतरलेल्या धोनीने संघाला १३१ पर्यंत नेण्यास मदत केली. फलंदाजीत सरासरी कामगिरी केल्यानंतर त्यांना गोलंदाजीतही प्रभाव पाडता आला नाही. ज्यामुळे कोलकाता संघाने चेन्नईला ६ विकेट्सने पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज डेव्हॉन कॉनवे गायकवाडसह मैदानात उतरला होता. मात्र चेन्नईचे सलामीवीर लवकर माघारी परतले. माध्यमफळीला उथप्पा आणि रायडूने धावा करायचे प्रयत्न केले मात्र तेही माघारी परतले. यानंतर नाव कर्णधार जडेजा आणि माजी कर्णधार धोनी (ms dhoni) या दोघांनी मिळून चेन्नईचा खेळ सांभाळला. यात विशेष म्हणजे प्रॅक्टिसमध्ये दिसलेला फॉर्म माहीने सामन्यातही दाखवला. ३८ चेंडूत धोनीने धमाकेदार अर्धशतक झळकवले. ज्यामुळे संघ १३१ पर्यंत पोहचू शकला.
चेन्नईने (CSK) दिलेल्या १३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताकडून (KKR) सलामीवीर रहाणेने (Ajinkya rahane) ४४ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे टॉसवेळी श्रेयस तो संघात आहे हेही विसरला होता. रहाणेनंतर नितीश राणाने चांगली खेळी केली. चेन्नईने दिलेल्या कमी धावांचे लक्ष्य आरामात पूर्ण केले. गेल्या वर्षी उपविजेते ठरलेल्या कोलकाताने चेन्नईला परास्त करत विजयाने आयपीएलची सुरुवात केली आहे.