इंदुरन्स एमएसएलटीए सुहाना स्मार्ट राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा; पुण्याच्या विर चत्तुरचा अंतिम सामन्यात सहज विजय

औरंगाबाद(प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या 10 वर्षांखालील इंदुरन्स एमएसएलटीए सुहाना स्मार्ट राज्यस्तरीय स्पर्धा इंदुरान्स टेनिस सेंटरला पार पडली, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 60 ते 70 मुले व मुली स्पर्धक सहभागी झाले होते.मुलांच्या स्पर्धेत पुण्याच्या विर चत्तुर याने सोलापूरच्या यश पवार चा अंतिम सामन्यात ( 5-3,4-1) असा सहज विजय संपादन केला.तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या तमन्ना नायर हिने पुण्याच्या म्यारा शेख हीचा(4-0 4-0) असा पराभव केला.
Comments are closed.