भारतीय फुटबॉल संघाने सुनील छेत्रीचे नेतृत्वाखाली नेपाळला पराभूत करून सैफ चॅम्पियनशिप जिंकली आहे. भारताने नेपाळचा 3-0 अशा गोल फरकाने पराभव केला. या विजयासह भारताने सैफ चॅम्पियनशिप वर आठव्यांदा नाव कोरले. भारताच्या विजयासह कर्णधार सुनील छेत्री ने सुद्धा मोठी कामगिरी केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये लिओनेल मेस्सीच्या 80 गोल्स ची बरोबरी केली आहे. सुनील छेत्री ने 49 व्या मिनिटाला गोल करत ही कामगिरी केली. सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची आतापर्यंत भारताची कामगिरी सरस राहिली आहे
भारताने दुसऱ्या हात मधे तिन्ही गोल केले.यात सुनील छत्री,सुरेश सिंह व सहल अब्दुल समद यांनी गोंदवले.चॅम्पियनशिपच्या सुरुवातीला बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध भारताला बरोबरीत समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारताने नेपाळ,मालदीव विरोधात विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. शेवटी पुन्हा एकदा नेपाळला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले.